ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटक पोटनिवडणूक : १५ जागांसाठी मतदान सुरू, सत्ताधारी भाजपची कसोटी - कर'नाटक'चा अंक दुसरा

कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी म्हणजे आज पोटनिवडणूक होत असून मतदान सुरू झाले आहे.

सत्ताधारी भाजपची कसोटी
सत्ताधारी भाजपची कसोटी
author img

By

Published : Dec 5, 2019, 7:37 AM IST

बंगळुरू - कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज (५ डिसेंबर) मतदान होत आहे. राज्यातील सरकार टिकवण्यासाठी सत्तेवर असलेल्या भाजपने या निवडणुकीसाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. कर्नाटकात सत्ता टिकवण्यासाठी भाजपला 6 जागांवर विजय प्राप्त करणे आवश्यक आहे.


सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस व जनता दलाच्या 17 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याची वेळ राज्यात आली.


या पोटनिवडणुकीवर भाजपचे राज्यातील भविष्य अवलंबून आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाने हयगय केली नाही. एकीकडे भाजप राज्यात स्थिर सरकार रहावे म्हणून मतदान मागत आहे. तर काँग्रेस आणि जनता दलाने (सेक्युलर) सरकार पाडणाऱ्या त्या बंडखोर उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे सगळे बंडखोर सत्ताधारी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.


सध्या सत्तेत असलेली भाजप, आणि विरोधी पक्षात असलेली काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे सर्व १५ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. कर्नाटकमध्ये निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.


कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात, असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते सर्व आमदार भाजपकडून निवडणूक लढणार आहेत. या पोटनिवडणुकांसाठी कर्नाटकात ५ डिसेंबरला मतदान होत आहे. तर ९ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details