कोलंबो (श्रीलंका) -श्रीलंकेत बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) लोकसभा निवडणूक सुरू आहे. यात श्रीलंकेत लोकप्रिय असलेले राजपक्षे बांधवांना सर्वजण पाठिंबा देण्याची शक्यता आहे..
मागील नोव्हेंबर महिन्यात गोटाबाया राजपक्षे यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली होती. त्यांच मोठे माजी पंतप्रधान बंधू महिंदा राजपक्षे हे पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी 225 जागेची जुळवा-जळव करत आहेत.
ही निवडणूक एप्रिल महिन्यात होणार होती. मात्र, श्रीलंकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. श्रीलंकेत 2 हजार 834 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एप्रिल महिन्यातील ही निवडणूक आता घेण्यात येत आहे.
आज होत असलेल्या निवडणूक आरोग्य विषयक सर्व काळजी घेतली जात असून सामाजिक अंतराचेही पालन केले जात आहे. मतदारांना नोंदणीसाठी आपापले पेन घेऊन येण्यास सांगितले गेले आहे. जर कोणी पेन आणला नाही तर त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर पेनची व्यवस्था असून प्रत्येक वापरानंतर या पेनला निर्जंतुक करण्यात येत आहे.
आज संध्याकाळी मतदान संपेल. मतमोजणीला गुरुवारपासून सुरुवात होईल. अंतिम निकाल शुक्रवारी (दि. 6 ऑगस्ट) लागणे अपेक्षित आहेत.