बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे जावई व्ही.जी सिद्धार्थ बेपत्ता झाले आहेत. सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डेचे ते मालक आहेत. सिद्धार्थ बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबात दु:खाचे वातावरण आहे.
सीसीडीचे मालक व्ही.जी सिद्धार्थ बेपत्ता सिद्धार्थ यांच्या कुंटुंबाची विचारपूस करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांची भेट घेतली. दरम्यान प्रशासनाकडून ते बेपत्ता झाल्याप्रकरणी काणकणाडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्याचबरोबर त्यांनी सीसीडीतील कर्मचारी आणि, संचालक मंडळाला एक पत्र पाठविल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान प्रशासनाने एनडीआरएफ आणि कोस्टगार्ड सोबत ८ पथकांची निर्मिती केली होती. त्यानुसार एनडीआरएफने मंगळुरू येथील नेत्रावती नदीमध्ये शोधकार्य सुरु केले आहे.
व्ही.जी सिद्धार्थ व त्यांचे परिवार सिद्धार्थवर वेगवेगळ्या बँकांचे ८ हजार ८२ कोटींचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर सीसीडीचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आहेत.
व्ही.जी सिद्धार्थ यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेले हेच ते पत्र उल्लाल पुलावरुन नेथ्रावती नदीमध्ये उडी घेणारा व्यक्ती हा सिद्धार्थच असावा; वाहनचालकाचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, एका व्यक्तीने कथितपणे रात्री ९ वाजता उल्लाल पुलावरुन नेथ्रावती नदीमध्ये उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, हा अज्ञात व्यक्ती सिद्धार्थ असल्याचा संशय त्यांच्या वाहनचालकाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, सिद्धार्थ यांनी उल्लाल पुलापर्यंत गाडीने प्रवास केला होता. तेथे पोहोचल्यावर त्यांनी गाडी थांबवायला लावली. त्यानंतर ते काही दूरपर्यंत गेले आणि नंतर बेपत्ता झाले. त्यादरम्यान वाहनचालक त्यांची वाट पाहत होता. ते परत न आल्याने त्याने याबाबत पोलिसांना कळविले, अशी माहिती मिळाली आहे.
एनडीआरएफ कडून शोधमोहिम सुरू