अमरावती (आंध्रप्रदेश)– आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने विशाखापट्टणममधील गॅसगळती प्रकरणाच्या आरोपींना जामीन दिला आहे. यामध्ये एलजी पॉलिमर्सचे सीईओ सुनके जेयाँग, संचालक डी. एस. किम आणि ऑपरेशनल डायरेक्टर पी. पी. मोहन राव यांचा समावेश आहे. याशिवाय आठ आरोपींनाही उच्च न्यायालयाने जामिन दिला आहे.
गेल्या महिन्यात पोलिसांनी वायूगळती प्रकरणातील 12 आरोपींची पोलीस कोठडी 5 ऑगस्टपर्यंत वाढवून घेतली होती. विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर्समधून वायूगळती झाल्याने 7 मे रोजी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एलजी पॉलिमर्स व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची नियुक्ती करण्यात आलेल्या विशेष समितीचे अध्यक्ष नीराभ कुमार प्रसाद यांनी दोन महिन्यानंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांनी जुलै यांना अहवाल सोपविला आहे.
सुरक्षेसाठी पुरेशा नसलेल्या उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीची यंत्रणा बंद पडल्याने वायूगळतीचा अपघात झाल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.