वॉशिंग्टन डी. सी -विशाखापट्टनम वायूगळती प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटनीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटले आहे. वायूगळतीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारखान्याच्या परिसरात राहणाऱ्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमींप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी, असे संयुक्त राष्ट्रसंघटनेने प्रवक्त्या स्टेफनी डुजारीक यांनीही म्हटले आहे.