विश्वेश्वर हेगडे कागिरी यांची कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड - विधानसभा
अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची मुदत दुपारी १२ वाजेपर्यंतची होती. मात्र, कागिरी सोडता कोणीही अर्ज दाखल केला नव्हता.
विश्वेश्वर हेगडे कागिरी
बंगळुरु- भाजपचे वरिष्ठ नेत विश्वेश्वर हेगडे कागिरी यांची कर्नाटक राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून यांनी निवड करण्यात आली आहे. एकमताने त्यांनी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची मुदत दुपारी १२ वाजेपर्यंतची होती. मात्र, कागिरी सोडता कोणीही अर्ज दाखल केला नव्हता. मंगळवारी के. आर रमेश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष पदाची खुर्ची रिकामी होती.कर्नाटक विधानसभेचे सचिव के. विशालक्षी यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा, भाजप नेते गोविंद करजोल, आर. अशोक, जगदीश शेट्टार, के. एस. ईश्वरप्पा उपस्थित होते.
१४ महिन्याच्या कार्यकाळानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळले. त्यांनतर भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला. भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष के. आर रमेश कुमार यांनी राजीनामा दिला होता.