लखनऊ -शहाजाहापूर जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थिती लावलेल्यांची माहिती पुरवणाऱ्यांना दहा हजारांचे बक्षिस जाहीर केले आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचाव करण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.
#TabhligiJamat: 'त्यांना' शोधा आणि दहा हजार मिळवा! - VHP india
शहाजाहापूर जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थिती लावलेल्यांची माहिती पुरवणाऱ्यांना दहा हजारांचे बक्षिस जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत निजामुद्दीन येथे तबलिगी मरकझ जमात हा इस्लाम धर्मियांचा कार्यक्रम पार पडला. संबंधित कार्यक्रमाला देशभरातून इस्लाम धर्मियांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. तसेच तेलंगणात काहींचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र अनुयायांबद्दल द्वेष व्यक्त होतोय. यातच आता विश्व हिंदू परिषदेतेने उडी घेतली आहे.
शहाजहांपूरचे जिल्हा अध्यक्ष राजेश अवस्थी यांनी संबंधित कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांबद्दल माहिती देणाऱ्यांना दहा हजारांचे बक्षिस जाहीर केले आहे. तबलिगी जमातीचे लोक समाजात लपून बसले असून ते संसर्ग पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.