ग्वालियर -विजयादशमीनिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बंजरगदलाच्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. यावेळी जवळपास सातवेळा हवेत गोळीबार करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मध्यप्रदेशमध्ये विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार, १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल - विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपुजन
विजयादशमीनिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमामध्ये गोळीबार करण्यात आला आहे.
भारतीय प्रथेनुसार विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. मध्यप्रदेशमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पोलीस उपस्थित असताना ही कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार केला.
यासंबधित व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाचे कार्यकर्ते हवेत गोळीबार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम'चे घोषणाही दिल्या. दरम्यान घटनेच्या दोन दिवसानंतर पोलिसांनी संबधित १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.