नवी दिल्ली - अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का गर्भवती असून याबाबत विराटने ट्विट करत माहिती दिली आहे.
आता आम्ही दोघांचे तीन होणार असून तिसरा जानेवारी २०२१मध्ये येणार असल्याचे त्यानी ट्विटवरून सांगितले आहे. विराट-अनुष्काने ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाळाच्या आगमनाची बातमी मिळाल्यामुळे दोघांनाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने शेअर केलेल्या दोघांच्या फोटोमध्ये अनुष्काचे बेबी बम्प दिसून येत आहे.