नवी दिल्ली- सोशल मीडियावर विविध भाज्या आणि फळे कापण्याचे अनेक व्हिडिओ टाकले जातात. यामध्ये डाळिंब किंवा अननस कापण्यासारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. परंतु, सध्या लसूण सोलण्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये वेगळ्याप्रकारे लसूण सोलण्याची पध्दत दाखवली जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास २२. ५ मिलियन वेळा पाहिले गेले आहे.
VIDEO : लसूण सोलण्याची मजेशीर पद्धत; सोशल मीडियावर होतेय प्रचंड व्हायरल - पापुद्रे
व्हिडिओमध्ये लहान चाकूला लसणाच्या पाकळीमध्ये फसवून ओढल्यानंतर लसणाचे पापुद्रे सहज निघत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत २२.५ मिलियनवेळा पाहिले गेले आहे.
याआधीही लसूण सोलण्याचा अनेक पद्धतींचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये काचेच्या बाटलीत लसणाच्या पाकळ्या टाकून जोरजोरात हलवणे असो किंवा लसणाला मधोमध काटून त्यावरील पापुद्रे हटवणे असो. परंतु, व्हायरल व्हिडिओमध्ये लसून सोलण्याचा नवीनच प्रकार दाखवण्यात आला आहे. यामध्ये लहान चाकूला लसणाच्या पाकळीमध्ये फसवून ओढल्यानंतर लसणाचे पापुद्रे सहज निघत आहेत.
व्हिडिओला आतापर्यंत २२.५ मिलियनवेळा पाहिले गेले आहे. तर, ३ लाखांनी याला लाईक केले आहे आणि १ लाखाच्यावर वेळा व्हिडिओला रिट्विट करण्यात आले आहे.