जुनागढ -गुजरातमधील जुनागढच्या रस्त्यांवरून मनसोक्तपणे फिरणाऱ्या सिंहांचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. गिरनार वन्यप्राणी अभयारण्यातून फिरता-फिरता हे सिंह रस्त्यांवर येऊन पोहोचले आहेत. कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा घोळका फिरावा तसे हे सात सिंह रिमझिम पावसात रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फेरफटका मारत आहेत. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
हा व्हिडिओ अनेकांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटसवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांना पाहून रस्त्यावरील काही कुत्री भुंकताना दिसत आहेत. मात्र, हे जंगलाचे राजे कशाचीही काळजी न करता निवांत फिरण्याचा आनंद घेत आहेत. जुनागढमधील भावनाथ परिसरातील भारती आश्रम येथून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'त्याच्या' देशसेवेला सलाम! लष्कराच्या श्वानाचा मृत्यू, जवानांकडून आदरांजली