चेन्नई - प्रसिद्ध व्हायोलिन वादक टीएन कृष्णन यांचे सोमवारी सायंकाळी चेन्नईमध्ये निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
टीएन कृष्णन यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९२८ साली केरळमध्ये झाला होता. त्याचे पूर्ण नाव त्रिपुनिथुरा नारायणायर कृष्णन असे होते. वडील ए नारायण अय्यर यांच्याकडून त्यांनी बालपणात संगीताचे धडे गिरवले. वयाच्या ११व्या वर्षी त्यांनी तिरुअनंतरपुरममध्ये पहिला कॉन्सर्ट केला. यानंतर ते अल्लप्पीच्या पार्थसारथीचे मेंटर बनले. १९४२ला ते चेन्नईला स्थायिक झाले. यादरम्यान, ते सेमंगुडी श्रीनिवास यांच्या संपर्कात आले. हाच कृष्णन यांच्या संगीत करियरमधील टर्निंग पॉईंट ठरला.
या दिग्गजासोबत कृष्णन यांनी केलं काम -
कृष्णन यांनी अरियाकुडी रामानुज अयंगर, मुसिरी सुब्रमनिया अय्यर, अलाथुर ब्रदर्स, जीएन बालासुब्रमण्यम, मदुरै मणी अय्यर, वैद्यनाथ भगवान, एमडी रामनाथन आणि महाराजपुरम विश्वनाथ अय्यर यासारख्या महान संगीतकारांसोबत काम केलं.