महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांविरोधातील कुठल्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांच्याद्वारे बेंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता लढा देणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स इतर कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. तसेच, त्यांच्यावर होणाऱ्या कुठल्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी बातमी

By

Published : Jun 1, 2020, 5:49 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी रुग्णांच्या सेवेत दिवसरात्र एक करत आहेत. अशा कोरोना योद्यांचे कार्य अतुलनीय असून या लढाईत त्यांचा विजय नक्की होईल. मात्र, या महामारीविरोधात लढणाऱ्या या योद्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारचा हिंसाचार मान्य नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी कर्नाटकच्या बंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून उद्धाटन केले. कोरोना विषाणू हा शत्रू कितीही मोठा असला तरी आमचे आरोग्य विभागातील योद्धा त्याला हरविण्यासाठीची लढाई खंबीरपणे लढत आहेत. हे युद्ध कितीही मोठे असले तरी यात कोरोनाला हरवून विजय आमच्या या योद्ध्यांचाच होणार, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. कोरोना विरुद्ध लढा देताना देशातील आरोग्य व्यवस्था जे कार्य करत आहे, त्याचे मोजमाप करता येणे शक्य नाही.

या संकटकाळात देशातील जनता ही डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांकडे आशेने बघताहेत. मात्र, या संकटकाळात त्यांच्यावर देशभरात हल्ले होण्याच्या बातम्यादेखील येत आहेत. जे डॉक्टर आणि इतर कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून देशातील जनतेला या महामारीच्या पिंजऱ्यातून सोडवण्याचा प्रयत्न करातहेत. त्यांच्यावर क्रूरपणे केले जाणारे हल्ले किंवा हिंसाचार हे खपवून घेतले जाणार नाहीत, असेही ते बोलताना म्हणाले. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या रक्षणासाठी पावले उचलली गेली आहेत, असेही ते म्हणाले. “कोणत्याही प्रकारच्या हिंसेपासून तुमचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लढणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यासाठी 50 लाख रुपयांचा विमा संरक्षणही प्रदान करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, एप्रिलमध्ये सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेल्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांविरूद्ध हिंसाचार, छळ, मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात अध्यादेश काढला होता. त्यानुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच, जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंतची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंडाची तरतुदही या अध्यादेशात करण्यात आली आहे.

अशा गुन्ह्यांसाठी एका व्यक्तीस तीन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्याशिवाय 50 हजार ते दोन रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, अशा घटनेत वैद्यकीय कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत आरोपीस सहा महिन्यांपासून ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. महामारी रोग अधिनियम, 1987 नुसार या अध्यादेशात सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना ते राहत असलेल्या घराच्या घरमालकांकडून किंवा शेजाऱ्यांकडून कोरोनाच्या संसर्गावरील संशयावरून त्रास दिल्यास त्यांच्यावरदेखील कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details