अमरावती - आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात पुरातन भगवान नागेश्वरा(शिव) मंदिर गावकऱ्यांनी खोदून काढले आहे. जिल्ह्यातील चेजराला मंडळातील पेरुमल्लापाडू गावामध्ये हे प्राचिन मंदिर सापडले आहे. हे मंदिर 300 वर्ष जुने असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला असून मंदिर पाहण्यास मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
आंध्रप्रदेश: नेल्लोर जिल्ह्यात गावकऱ्यांनी खोदून काढले पुरातन शिव मंदिर - प्राचिन शिव मंदिर आंध्रप्रदेश
गावातील काही उत्साही तरुणांनी मंदिराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. शेवटी मंगळवारी उत्खनन करताना मंदिर सापडले. खोदकाम सुरू असताना नागरिकांनी गर्दी केली होती.
![आंध्रप्रदेश: नेल्लोर जिल्ह्यात गावकऱ्यांनी खोदून काढले पुरातन शिव मंदिर पुरातन शिव मंदिर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:27-7650638-v.jpg)
भगवान परशुरामाने या मंदिराची स्थापना केल्याची गावकऱ्यांची श्रद्धा आहे. पेन्ना नदीच्या किनारी हे मंदिर वसलेले होते. मात्र, मंदिर मातीखाली गाडले गेले. हे मंदिर 300 वर्ष पुरातन असून 200 एकरच्या परिसरात पसरले आहे, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. या भागात माती जास्त असल्याने पेरुमल्लापाडू गाव 50 वर्षापूर्वी दुसऱ्या ठिकाणी वसवण्यात आले होते. मात्र, मंदिर मातीखाली गाडले गेले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
गावातील काही उत्साही तरुणांनी मंदिराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. शेवटी मंगळवारी उत्खनन करताना मंदिर सापडले. खोदकाम सुरू असताना नागरिकांनी गर्दी केली होती. काही महिलांनी मंदिरासमोर विशेष पूजाही केली. मंदिर सापडल्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाला माहिती दिली.