जगदलपूर - चिंच म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आंबट आणि चटपटी असलेली चिंच कोणालाही हवीहवीशी वाटते. आशियामधील सर्वात मोठे चिंचेचे मार्केट म्हणून बस्तरची ओळख आहे. येथील नागरिक सध्या याच चिंचेवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. जगदलपूर येथील जामवाडा येथे लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील रहिवास्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चिंच विकून येथील रहिवासी आपला उदरनिर्वाह करत आहेत.
जगभरात कोरोनाचे थैमान वाढत असताना देशात लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत दैनंदिन मजूरांचे कामही बंद झाले. बाजार बंद असल्यामुळे आता चिंच विकून येथील रहिवासी थोडेफार पैसे जमवत आहेत.