राजगड(मध्य प्रदेश) - रामपुरीया गावात स्थानिक लॉकडाऊनचे उल्लंघन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी पोलिसांशी हुज्जत घातली. एवढेच नाहीतर ग्रामस्थांनी पोलिसांना धक्काबुक्की करत गावाबाहेर जाऊ दिले नाही. जवळपास २ तासानंतर बाहेरुन पोलीस आले आणि कारवाईच्या आश्वासनानंतर अडकलेल्या पोलिसांची सुटका झाली.
दारूविक्रीची माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी बनवले बंधक
राजगढच्या रामपुरीया गावात दारूविक्रीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. मात्र, ग्रामस्थांनी पोलिसांना बंदी बनवून ठेवले.
दारूविक्रीची माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी बनवले बंधक
रविवारी पोलिसांना माहिती मिळाली की, रामपुरीया गावात दारूविक्री होत आहे. तात्काळ दोन पोलीस गावात पोहोचले. मात्र, त्यांना तिथे असे काहीच आढळले नाही. दरम्यान, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ गोळा झाले. त्यांना हटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर खुजनेरहून पोलीस आले आणि ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना गावाबाहेर जाऊ दिले.