महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारच्या अरारियामध्ये लॉकडाऊनचे नियम धाब्यावर... गावकऱ्यांनी लावले प्रेमी युगुलाचे लग्न - lock down

या लग्नात ना सोशल डिस्टंस पाळण्यात आले, ना मास्क वापरण्यात आला. या विवाहाचा एक व्हिडियो बनवून कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला आणि या लग्नाचे बिंग फुटले.

Villagers get married to lover couple in Araria
बिहारच्या अररियामध्ये लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून गावकऱ्यांनी प्रेमी युगुलाचे लावले लग्न, गुन्हा दाखल

By

Published : Apr 26, 2020, 3:13 PM IST

अरारिया(बिहार)- जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाला पकडून गावकऱ्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. मात्र, हे लग्न प्रेमी युगुलासह गावकऱ्यांनादेखील महागात पडले आहे. पोलिसांनी लॉकडाऊन असताना शेकडो लोकांनी उपस्थित राहून हे लग्न लावून दिल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अरारियाच्या फारबिसगंज परिसातील घोडाघाटमध्ये लोकांनी लॉकडाऊनचा फज्जा उडवला आहे. गावातील हजारो लोकांनी मिळून एका प्रेमी युगुलाचे लग्न लावून दिले. विधीनुसार हा विवाह सोहळा पार पडला. मात्र, यादरम्यान येथे लॉकडाऊनचा नियम पायदळी तुडवला गेला. या लग्नात ना सोशल डिस्टंस पाळण्यात आले, ना मास्क वापरण्यात आला. या विवाहाचा एक व्हिडियो बनवून कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला आणि या लग्नाचे बिंग फुटले.

व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि चौकशीला सुरुवात केली. पोलिसांना सिमराहा ठाण्यात २७ जणांविरोधात आणि २३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या लग्नाचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी लोक सोशल डिस्टंस आणि लॉकडाऊनच्या नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक जबाबदारीने न वागल्यास याचे गंभीर परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावे लागणार, यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details