महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO: अजबच.! गाय, बैलांच्या पायाखाली स्वतःला तुडवून साजरा केला जातो 'गाई गोहरी' सण - gaai gohri festival

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात दाहोद जिल्ह्यात साजरा केला जातो. स्थानिक नागरिक जमिनीवर झोपून आपल्या अंगावर गाय आणि बैलांना तुडवून घेत असतात. महत्वाचे म्हणजे, हा सण गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

VIDEO: अजबच.! गाय, बैलांच्या पायाखाली स्वतःला तुडवून साजरा केला जातो 'गाई गोहरी' सण

By

Published : Oct 28, 2019, 6:44 PM IST

दाहोद (गुजरात) - भारत देश विविधतेने नटलेला देश म्हणून प्रचलित आहे. भारतात असंख्य चाली-रीती, रुढी परंपरा वर्षांनुवर्षे चालत आलेली आहेत. अशी एक परंपरा गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात जपली जात आहे. या जिल्ह्यात 'गाई गोहरी' नावाचा सण साजरा केला जातो. या सणामध्ये नागरिक गाय आणि बैल यांच्या पायाखाली झोकून देऊन स्वतःला तुडवून घेतात. पाहा व्हिडिओ...

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात दाहोद जिल्ह्यात साजरा केला जातो. स्थानिक नागरिक जमिनीवर झोपून आपल्या अंगावर गाय आणि बैलांना तुडवून घेत असतात. महत्वाचे म्हणजे, हा सण गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

नागरिक सकाळी आपल्या घरच्या कुलदेवतेची पुजा करून घरातील गाय आणि बैलांना रंगवतात. रंगासोबत मोर पंख तसेच फुगे लावून आकर्षक सजावटही केली जाते. दरम्यान, श्रद्धेतून सुरुवात होणार्‍या या सणाचा शेवट अंधश्रद्धेत होत असल्याचे दिसते.

ABOUT THE AUTHOR

...view details