महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

..यामुळे झाला विकास दुबेचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालात उघड

10 जुलै रोजी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याचा चकमकीत मृत्यू झाला होता. त्याचा शवविच्छेदन अहवाल रविवारी आला आहे. गोळी लागल्यानंतर रक्तश्राव झाल्यामुळे आणि धक्क्यामुळे दुबेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

By

Published : Jul 20, 2020, 12:07 PM IST

vikas dubey
विकास दुबे

कानपूर- कुख्यात गुंड विकास याचा शवविच्छेदन अहवाल रविवारी प्राप्त झाला. यामध्ये दुबे याचा मृत्यू गोळी लागल्याने रक्तश्राव झाल्यामुळे आणि धक्क्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

10 जुलै रोजी मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशातील कानपूर येथे असताना विकास दुबे पोलीस चकमकीत मारला गेला होता. पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना कानपूर जवळील भाऊंटी येथे झालेल्या चकमकीत विकास दुबेने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. दुबेची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

3 जुलै रोजी विकास दुबे आणि त्याची साथीदारांनी 8 पोलिसांची हत्या केली होती. यानंतर दुबे फरार झाला होता. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल मंदिरात 9 जुलैला दुबे याला ताब्यात घेण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details