महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्रप्रदेश: चार कोटींच्या दागिने चोरीचा काही तासांत छडा, सुरक्षा रक्षकच होता 'मास्टरमाईंड' - jewellery theft vijayawada

शुक्रवारी शहरातील साई चरण ज्वेलर्समधून चार कोटींची दागिने चोरीला गेली होती. दुकान मालक सर्व दागिने सायंकाळी एका लॉकरमध्ये ठेवत असे. तसेच दुकानाची देखरेख करण्यासाठी विक्रम कुमार लोहार या व्यक्तीला ठेवण्यात आले होते.

विजयवाडा पोलीस
विजयवाडा पोलीस

By

Published : Jul 25, 2020, 6:31 PM IST

विजयवाडा -आंध्रप्रदेशातील विजयवाडा पोलिसांनी काल(शुक्रवार) काही तासांच्या आत 4 कोटी रुपयांच्या दागिने चोरी प्रकरणाचा छडा लावला. ज्वेलर शॉपमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानेच दागिने चोरीचा बनाव रचला होता. सोने-चांदीची चार कोटींची दागिने लंपास करून सुरक्षा रक्षकाने स्वत:ला बांधून घेतले होते. चोरीचा बनाव पोलिसी खाक्या दाखवताच उघडा पडला.

सुरक्षा रक्षकाकडून 7 किलो सोने, 19 किलो चांदी आणि 42 लाखांची नकद रक्कम जप्त करण्यात आली आहे. विजयवाडा शहरातली कातुरीवारी रस्त्यावरील साई चरण ज्वेलरीच्या दुकानात ही घटना घडली. वन टाऊन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी काही तासांत या दरोड्याचा पर्दाफाश केला. विजयवाडाचे पोलीस आयुक्त बी. श्रीनिवासुलु यांनी सांगितले की, आरोपी विक्रम कुमार लोहार या मूळच्या राजस्थानमधील सुरक्षा रक्षक आणि दुकानाची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी शहरातील साई चरण ज्वेलर्समधून चार कोटींचे दागिने चोरीला गेले होते. दुकान मालक सर्व दागिने सायंकाळी एका लॉकरमध्ये ठेवत असे. तसेच दुकानाची देखरेख करण्यासाठी विक्रम कुमार लोहार या व्यक्तीला ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी दुसरा कर्मचारी कामावर आला असता त्याला विक्रम बांधुन टाकलेल्या अवस्थेत दिसला. तसेच तो जखमीही होता. दुकानातील दागिने चोरीला गेले होते, असे श्रीनिवासुलु यांनी सांगितले.

पोलिसांना दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांचा सुरक्षा रक्षकावरचा संशय वाढला. या दरोड्याचा मुख्य सुत्रधार विक्रमच असल्याचे तपासात समोर आले. त्याने दोन बॅगमध्ये सर्व दागिने भरले आणि दुकानाच्या मागच्या बाजुने नेऊन दुसरीकडे लपवून ठेवले. त्यानंतर त्याने स्वत:ला जखमी करत बांधुन घेतले अन् चोरी झाल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी हा बनाव काही तासात उघडा पाडला, असे श्रीनावासुलु यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details