पणजी- सरकार संख्याबळाच्या आधारे आपले निर्णय जनतेवर लादत आहे. त्यामुळे दिल्लीतील 'जेएनयू'मध्ये आज जे घडले ते विधानसभेतही घडू शकते. दोन्ही ठिकाणी सरकारची भूमिका बघितली तर लक्षणे सारखीच आहेत, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी आज व्यक्त केले. गोवा विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनात विरोधी आमदारांनी आणलेला स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोवा फॉरवर्डचे पक्षाध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी विधानसभा विशेष अधिवेशनात म्हादई पाणी वळविण्याच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्याला काँग्रेस, मगो (महाराष्ट्रवादी गोमंतक) आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, सभापती राजेश पाटणेकर यांनी तो फेटाळला. त्यामुळे सर्व विरोधी आमदारांनी विधानसभा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या दालनात माध्यमांसमोर आपले म्हणणे मांडले.
हेही वाचा - भारतीय रेल्वे पुन्हा येणार रूळावर..?
यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर, काँग्रेसचे अध्य आमदार, गोवा फॉरवर्डचे आमदार आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे उपस्थित होते.