महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रत्यार्पण लांबणीवर पडल्यामुळे पळपुटा मद्यसम्राट झाला खुश ; म्हणतो...'गॉड इज ग्रेट' - England

आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय माल्या याला प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्यास लंडनच्या हायकोर्टाने परवानगी दिली आहे. या दिलासादायक निर्णयामुळे माल्याने टि्वट करुन 'गॉड इज ग्रेट' असे म्हटले आहे.

मद्यसम्राट माल्या

By

Published : Jul 3, 2019, 10:11 AM IST

Updated : Jul 3, 2019, 12:50 PM IST

लंडन - आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय माल्या याला प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्यास लंडनच्या हायकोर्टाने परवानगी दिली आहे. या दिलासादायक निर्णयामुळे माल्याने टि्वट करुन 'गॉड इज ग्रेट' असे म्हटले आहे.


'देव महान आहे. न्याय होत असतो. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासह दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी मला सीबीआयने लावलेल्या आरोपांवर याचिका दाखल करण्यास परवाणगी दिली आहे. मी नेहमीच म्हटले आहे. माझ्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत', असे माल्याने टि्वट करुन म्हटले आहे.


'मी पुन्हा एकदा किंगफिशर एअरलाइन्सच्या बँकांना पैसे परत देण्याचा प्रस्ताव मांडत आहे. कृपया पैसे घ्या. मी कर्मचारी आणि इतर कर्जदारांचे देखील पैसे देऊन आयुष्यात पुढे जाऊ इच्छितो आहे', असे मल्याने दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


'माझा उपहास केल्यानंतर ही मी सगळ्याचे लक्ष इंग्लंड खंडपीठाच्या निर्णयाकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. सीबीआयने माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या आरोपांविरोधात इंग्लंड खंडपीठाने मला याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे', असे माल्याने आपल्या तिसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


पळपुटा मद्यसम्राट विजय माल्याने मंगळवारी लंडनच्या उच्च न्यायालयात दाखल झाला. त्याने न्यायालयाकडे भारताला प्रत्यार्पण होण्याविरुद्ध याचिका करण्याची परवानगी मागितली होती. ६३ वर्षीय माल्यावर भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. तसेच, भारतात घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार आणि विदेशी विनियम व्यवस्थापक कायदा (फेमा) यांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.

Last Updated : Jul 3, 2019, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details