नवी दिल्ली - भारतीय बँकांना गंडा घालून देशाबाहेर परागंदा झालेला उद्योजक विजय मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने आपली आणि नातेवाईकांच्या मालकीची मालमत्ता जप्त करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
मालमत्तेच्या जप्ती आदेशाला स्थगिती द्यावी, विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका - supreme court
मल्ल्याने याचिकेत म्हटले आहे की, केवळ किंगफिशर एअरलाईन संदर्भातील संपत्तीची जप्ती करण्यात यावी. आपली आणि नातेवाईकांच्या मालकीच्या मालमत्तेची जप्ती करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.
विजय मल्ल्याने भारतीय बँकाना जवळपास 9 हजार कोटींचा गंडा घातला. त्यानंतर तो परदेशात फरार झाला. बँकाच्या वसुलीसाठी मल्ल्याच्या संपत्तीवर जप्तीचे आदेश देण्यात आले. तेव्हा मल्ल्याने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर सोमवारी (29 जुलै) सुनावणी करणार आहे.
मल्ल्याने याचिकेत म्हटले आहे की, केवळ किंगफिशर एअरलाईन संदर्भातील संपत्तीची जप्ती करण्यात यावी. आपली आणि नातेवाईकांच्या मालकीच्या मालमत्तेची जप्ती करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.