लंडन- विजय मल्ल्यावर विविधा बँकांचे सुमारे १० हाजर कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज वसूल करण्यासाठी व मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी स्टेट बँक व तिच्या नेतृत्वाखालील इतर बँकांच्या संघटनेने शहरातील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला उच्च न्यायालयाने काल स्थगिती दिली.
जो पर्यंत भारतातील सर्वोच्च न्यायालयात मल्ल्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिका आणि कर्नाटकातील उच्च न्यायालयात त्याच्यातर्फे दाखल झालेल्या तोडगा प्रस्तावाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत माल्ल्याला थोडा वेळ द्यायला हवा, असा निकाल उच्च न्यायालयाच्या दिवाळखोर विभागाचे न्यायमूर्ती माईकल ब्रिग्स यांनी दिला आहे.