नवी दिल्ली - पळपुटा मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हलवर भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी पोहोचला आहे. माध्यम प्रतिनिधींनी मल्ल्या याच्याशी संवाद साधला असता, मल्ल्या याने सामना पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. याआधीही मल्ल्या याने अनेकदा भारताच्या क्रिकेट सामन्यांना उपस्थिती लावली आहे.
पळपुटा मद्यसम्राट विजय मल्ल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी स्टेडिअमवर - india australia match
पळपुटा मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हलवर भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी पोहोचला आहे. त्याला प्रत्यर्पणाविषयी विचारणा केली असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे समजले आहे.
विजय मल्ल्या ओव्हलवर
सध्या मल्ल्या लंडनमध्ये असून त्याला भारतात आणण्यासाठी प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे. मल्ल्याने भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे. त्याची ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्रत्यर्पणाविषयी विचारणा केली असता मल्ल्या याने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे समजले आहे.
आज भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान आयसीसी विश्व करंडक २०१९ मधील १४ सामना ओव्हलच्या केनिंग्टन मैदानावर सुरू आहे.