नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. राफेलच्या या पूजनामुळे नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याचबरोबर मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी अंधश्रद्धेवरून एका मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
..जेव्हा गाडीवर लिंबू-मिर्ची लावणाऱ्यांची मोदींनी उडवली होती खिल्ली, जुन्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल - गाडीला लिंबू आणि मिर्ची
मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी अंधश्रद्धेवरून एका मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
![..जेव्हा गाडीवर लिंबू-मिर्ची लावणाऱ्यांची मोदींनी उडवली होती खिल्ली, जुन्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4711033-72-4711033-1570710466973.jpg)
नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०१७ ला दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइन मार्गिकेचे उद्घाटन कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धेवरुन एका मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. 'काही लोक अजून जुन्या विचारांमध्ये कैद आहेत. देशामध्ये परंपरेच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी केल्या जातात. आपण तंत्रज्ञानाच्या युगात असून येथे अंधश्रध्देला स्थान नसावे. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिले की एका मुख्यमंत्र्याने गाडीच्या रंगावरून गाडीला लिंबू आणि मिर्ची बांधली होती. ही अशी लोक देशाला काय प्रेरणा देणार,' असे म्हणताना मोदींना हसूदेखील आवरता आले नाही. त्यांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून नेटकरी मोदींवर टीका करत आहेत.
फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी राजनाथ सिंह यांनी राफेलमधून उड्डाण करण्यापूर्वी त्याची शस्त्रपूजा करत ओम लिहिले. त्यानंतर विमानाला फुले आणि श्रीफळ वाहिले. याचबरोबर चाकाखाली लिंबू ठेवले होते. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे.