श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) -मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरला झाला होता. ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या बडगाव जिल्ह्यामध्ये पोलीस दुकानं आणि घरं फोडत असल्याचे पाहायला मिळाले. याआधी पोलीस उपअधीक्षक फय्याज हुसेन हे दगडफेकीमध्ये जखमी झाले होते, त्यामुळे असा प्रकार घडला. मात्र, दुकानांची नासधूस होत असलेल्या दोन मिनिटांच्या व्हिडिओबाबत आयजीपी विजय कुमार यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांकडून दुकानांसह घरांची नासधूस - आयजीपी विजय कुमार
बडगाव जिल्ह्यापासून 11 किमी अंतरावर असलेल्या नसरुल्हापुरा गावात पोलीस घरांची तोडफोड आणि दुकानातील वस्तू बाहेर फेकून नासधूस करत असल्याचे दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
जम्मू आणि काश्मिरमधील व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांकडून दुकानांसह घरांची नासधूस
बडगाव जिल्ह्यापासून 11 किमी अंतरावर असलेल्या नसरुल्हापुरा गावात पोलीस घरांची तोडफोड आणि दुकानातील वस्तू बाहेर फेकून नासधूस करत असल्याचे दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक फय्याज हुसेन यांना दगडफेकीमध्ये डोक्याला जखम झाली होती.