भोपाळ -मध्यप्रदेशच्या मंडलामधील रुग्णालयात एक विशेष बाब पहायला मिळाली. या रुग्णालयामध्ये डॉक्टर साहेबांच्या खुर्चीवर डॉक्टरांच्या ऐवजी चक्क एक कुत्र बसलेले दिसून आले. या रुग्णालयातील या 'डॉक्टर कुत्र्याचा' व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा या व्हिडिओमध्ये समोर आला आहे. बह्मनीमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रात एक व्यक्ती आपल्या इलाजासाठी गेला होता. यावेळी डॉक्टरांच्या कक्षात डॉक्टर तर नव्हतेच, मात्र त्याऐवजी तिथल्या खुर्चीवर एक भटके कुत्रे अगदी आरामत बसले होते, जणू तो कक्ष त्या कुत्र्याचाच असावा. हा प्रकार पाहताच त्या व्यक्तीने याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.