महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO : फलाटावरुन घसरुन धावत्या रेल्वेखाली गेला प्रवासी, त्यानंतर घडले असे.... - ओडिशा

रेल्वेखाली गेल्याने सर्व लोकांना तो जगणार नाही याची खात्री झाली होती. परंतु, फलाटावरुन रेल्वे गेल्यानंतर तो उठून उभा राहिला. हे दृश्य बघून उपस्थित लोक आश्चर्यचकीत झाले.

रेल्वेखाली गेलेला व्यक्ती

By

Published : Jun 20, 2019, 1:36 PM IST

Updated : Jun 20, 2019, 2:24 PM IST

भुवनेश्वर- ओडिशा येथील झारसगुडा रेल्वे स्टेशनवर चालत्या रेल्वेत एक व्यक्ती बसण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वेखाली आला. त्याला वाचवण्याचा एकाने प्रयत्नही केला परंतु, रेल्वेखाली जाण्यापासून तो त्याला वाचवू शकला नाही.

व्हिडिओ

रेल्वेखाली गेल्याने सर्व लोकांना तो जगणार नाही याची खात्री झाली होती. परंतु, फलाटावरुन रेल्वे गेल्यानंतर तो उठून उभा राहिला. हे दृश्य बघून उपस्थित लोक आश्चर्यचकीत झाले. याआधी अशा घटनामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वेकडून अपघात टाळण्यासाठी प्रवाशांनी चालत्या गाडीत चढू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. परंतु, प्रवासी सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे, अपघात झाल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागते.

Last Updated : Jun 20, 2019, 2:24 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details