महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशात 'या' देवाला भाविक वाहतात चक्क 'विंचू' - kurnool news

हा विंचू उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. येथे राज्यभरातील निःसंतान जोडपीही देवदर्शनासाठी येतात. आपल्या विविध इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी देवाची प्रार्थना करतात.

आंध्र प्रदेशात 'या' देवाला भाविक वाहतात चक्क 'विंचू'

By

Published : Aug 21, 2019, 5:58 PM IST

कुर्नूल - आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील कोडूमूर गावात एक विचित्र परंपरा आहे. येथील व्यंकटेश्वर मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी चक्क जिवंत विंचू अर्पण करण्याची परंपरा आहे. तसेच, जिवंत विंचूंनी देवाला सुशोभितही केले जाते. गावातील डोंगरावर हे मंदिर आहे. ही परंपरा अनेक दशकांपासून चालत आली आहे.

अगदी जोरदार डंख मारणारे विंचू या दिवशी शांत असतात. या दिवशी ते भाविकांना काहीही नुकसान पोहोचवत नाहीत. 'चुकून एखाद्या विंचवाने त्या दिवशी कुणाला दंश केलाच तर, त्या दंशाच्या वेदना फार काळ राहत नाहीत. मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर या वेदना निघून जातात,' असे येथे येणारे भाविक सांगतात.

हा विंचू उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो

हा विंचू उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. येथे राज्यभरातील निःसंतान जोडपीही देवदर्शनासाठी येतात. आपल्या विविध इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी देवाची प्रार्थना करतात.

भाविकांमधील महिला, लहान मुले, पुरुष या दिवशी डोंगरावरील दगडांमध्ये, खडकांमध्ये लपलेले विंचू शोधतात. त्यांना पकडून न घाबरता धार्मिक विधींसाठी घेऊन जातात.

ABOUT THE AUTHOR

...view details