महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा: पुराच्या पाण्यातून वाचवलं एक महिन्याच्या मुलीला - एनडीआरएफ

गुजरातच्या अहमदाबाद, वडोदरा, वलसाड, नवसारी, राजकोट आणि सूरत या शहरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

बचावकार्य

By

Published : Aug 2, 2019, 6:07 PM IST

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद, वडोदरा, वलसाड, नवसारी, राजकोट आणि सूरत या शहरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. ठिकाणी पाणी साचलं आहे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत आणि यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातच एका फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


वडोदरामधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या प्रकारे श्री कृष्ण यांना वासूदेव यांनी डोक्यावर टोपामध्ये घेऊन नदी पार केली होती. त्याच प्रकारे पोलीस उपनिरीक्षक जी. के चावडा यांनी भरपावसात खांद्यापर्यंत भरलेल्या पाण्यातून एक महिन्याच्या मुलीला वाचवलं आहे. शहरातील विश्वामित्री रेल्वे स्टेशनजवळील देवपुरा परिसरात 70 कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले होते. त्या मधील एका कुटुंबात 1 महिण्याची मुलगी होती. त्या मुलीला चावडा यांनी टोपामध्ये ठेऊन पाण्याच्या बाहेर काढले आहे.


पावसामुळे वडोदरामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भाग पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. वडोदरामधून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी गावामध्ये शिरल्यामुळे अनेक नागरिक अडकले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे

ABOUT THE AUTHOR

...view details