महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांना कोरोनाची लागण, पत्नी निगेटिव्ह - वेंकैया नायडू लेटेस्ट न्यूज

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांचीही आज कोरोना चाचणी करण्यात आली.

vice president venkaiah naidu tests corona positive
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांना कोरोनाची लागण, पत्नी निगेटिव्ह

By

Published : Sep 29, 2020, 9:59 PM IST

Updated : Sep 29, 2020, 10:04 PM IST

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी आज मंगळवारी सकाळी ही चाचणी केली. चाचणीनुसार, नायडू यांची प्रकृती ठीक असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांचीही आज कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली असून त्या क्वारंटाइन आहेत.

नायडू यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. २५हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हे अधिवेशन तहकूब करण्यात आले.

Last Updated : Sep 29, 2020, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details