नवी दिल्ली - माजी सनदी अधिकारी आणि झारखंडचे माजी राज्यपाल वेद मारवाह यांचे शुक्रवारी गोव्यात वयाच्या 87 व्या वर्षी दु:खद निधन झाले. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारवाह यांच्या निधनावर आपला शोक व्यक्त केला आहे. यावेळी पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांनी मारवाह यांच्या आठवणींना उजाळा दिला.
माजी राज्यपाल वेद मारवाह यांचे निधन, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त - COVID-19 death
उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारवाह यांच्या निधनावर आपला शोक व्यक्त केला आहे. यावेळी पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांनी मारवाह यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मारवाह यांनी मिझोरम, मनिपूर आणि झारखंड या राज्याचे राज्यपाल राहीले होते. तर 1980 साली दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले होते. "सार्वजनिक जीवनात श्री वेद मारवाह यांनी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे. सनदी अधिकारी म्हणून त्यांनी केलेली कामगिरी कायम स्मरणात राहिल". असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनीही ट्विट केले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे, की "मारवाह हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटूंबासोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो"