महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेएनयू विद्यापीठातील वीर सावरकर मार्गाच्या फलकाला फासले काळे - जेएनयू विद्यापीठ

विद्यापीठातील रस्त्याला सावरकरांचे नाव दिल्यामुळे वाद सुरू झाला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोषने रस्त्याला सावरकरांचे नाव देण्याच्या घटनेला लाजीरवाणी घटना म्हटले आहे.

जेएनयू विद्यापीठ
जेएनयू विद्यापीठ

By

Published : Mar 17, 2020, 1:46 PM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला 'वीर सावरकर मार्ग' असे नाव देण्यात आले आहे. या रस्त्याच्या फलकाला काल (सोमवारी) रात्री अज्ञात व्यक्तीने काळे फासल्याची घटना घडली आहे. या फलकावरून आधीच विद्यापीठात वाद सुरू आहे.

जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोषने रस्त्याला सावरकरांचे नाव देण्याच्या घटनेला लाजीरवाना प्रकार म्हटले आहे. तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनाही या मुद्द्यावरून आमने सामने उभ्या ठाकल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details