लखनौ -देशामध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या 220 पेक्षा अधिक झाली आहे. 'बेबी डॉल' या लोकप्रिय गाण्याची गायिका कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यत सिंह कनिकाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे वसुंधरा राजे अन् त्यांचा मुलगा दुष्यत सिंह हे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.
भाजप नेत्या वसुंधरा राजेंसह मुलगा दुष्यत सिंह सेल्फ आयसोलेशनमध्ये.. - Vasundhara Raje
'बेबी डॉल' या लोकप्रिय गाण्याची गायिका कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यत सिंह कनिकाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे.
वसुंधरा राजे यांनी टि्वट करून यासंबधीत माहिती दिली आहे. लखनऊमध्ये आयोजीत पार्टीमध्ये मी आणि माझा मुलगा दुष्यंत गेलो होतो. कनिकाही पार्टीमध्ये होती. दुर्दैवाने कनिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आम्ही सेल्फ आयसोलेशनमध्ये असून सर्व खबरदारी घेत आहोत, असे वसुंधरा राजे म्हणाले.
लंडनहून परतलेल्या बॉलिवुडची प्रसिद्ध गायिका कनिकाला कोरोनाची लागण झाली आहे. तिनेच इन्स्टाग्रामवर या संदर्भात माहिती दिली आहे. 'गेल्या ४ दिवसांपासून मला फ्ल्यूची लक्षणे होती. आज कोविड-१९ झाल्याचा अहवाल आला आहे. मी आणि माझे कुटुंब पूर्ण विलगीकरणात आहोत', असे तिने सांगितले आहे.