महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वरवरा राव यांना न्यूरोलॉजिकल उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात हलवले - एल्गार परिषद

तेलगू कवी वरवरा राव कोरोनाबाधित आढळले असून त्यांना न्यूरोलॉजिकल आणि यूरोलॉजिकल उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरवरा राव
वरवरा राव

By

Published : Jul 19, 2020, 11:31 AM IST

मुंबई - एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांना न्यूरोलॉजिकल आणि यूरोलॉजिकल उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरवरा राव (वय 80) यांच्यावर गुरुवारपासून दक्षिण मुंबईतील राज्य सरकार संचलित सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्यांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असल्याचे डॉक्टरांना उपचारादरम्यान आढळले. शुक्रवारी राज्य सरकारच्या जे.जे रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्टांनी त्यांची तपासणी केली आणि त्याला डिलीरियम असल्याचे निदान झाले.

डेलीरियम ही मनाची एक गंभीरपणे विचलित करणारी अवस्था आहे. त्यामुळे न्यूरोलॉजिकल आणि यूरोलॉजिकल उपचारांची आवश्यकता असल्याने रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांना खासगी नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले.

सेंट जॉर्ज रूग्णालयात असताना राव यांनी कोरोना उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या छातीचा एक्स-रे आणि ईसीजीही सामान्य होता. त्यांचे सीटी स्कॅनदेखील केले होते.

दरम्यान वरवरा राव यांच्या सुटकेची आणि त्यांच्यासाठी योग्य उपचार व्यवस्था करण्याची मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली होती.

एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्यावरून राव आणि इतर 9 सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या खटल्याचा सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला. मात्र, नंतर याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला होता. 31 डिसेंबर 2017 साली पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भडकाऊ भाषणे दिल्याचा आरोप या नेत्यांवर आहे. या परिषदेनंतर पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details