नवी दिल्ली - बनारस हिंदू विद्यापीठामधील आयुर्वेद व कला विद्याशाखेच्या संस्कृत विभागातील प्राध्यापकपदी फिरोझ खान यांची निवड केली आहे. फिरोझ खान यांना सोमवारी नियुक्ती पत्र मिळाले आहे. या विभागांपैकी एक विभाग निवडण्याची सूट त्यांना प्रशासनाने दिली आहे.
फिरोझ खान यांची आयुर्वेद-कला विद्याशाखेच्या संस्कृत विभागात निवड - firoz khan in ayurved departmen
बनारस हिंदू विद्यापीठामधील आयुर्वेद व कला विद्याशाखेच्या संस्कृत विभागातील प्राध्यापकपदी फिरोझ खान यांची निवड केली आहे.
फिरोझ खान यांनी मे महिन्यामध्ये आयुर्वेद व कला विद्याशाखेच्या संस्कृत विभागातील रिक्त जागांवर आवेदन केले होते. त्यामधील आयुर्वेद आणि कला विभागामध्ये त्यांची निवड झाली आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रशासनाची शनिवारी दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीत एक विभाग निवडण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार फिरोझ खान यांच्यावर सोडला आहे.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विभागात सहाय्यक प्राध्यापकपदी मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करण्याच्या निर्णयाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला होता. त्यावर धर्म, जात, समुदाय व लिंगभेद न करता सर्वांना समान संधी देण्याचे आमचे धोरण आहे, असे प्रशासनाने म्हटले होते.