महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वंदे भारत मिशनचा दुसरा टप्पा १६ मे पासून; ३१ देशातील भारतीय माघारी परतणार - वंदे भारत मिशन

या मिशनचा दुसरा टप्पा १६ मे ते २२ मे दरम्यान राबविला जाणार आहे. एअर इंडियाच्या १४९ फ्लाईटद्वारे ३१ देशांत अडकलेल्या सुमारे १६ हजार नागरिकांना माघारी आणण्यात येणार आहे.

vande bharat mission
वंदे भारत मिशन

By

Published : May 13, 2020, 9:56 AM IST

नवी दिल्ली - परदेशात अडकलेल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन सुरु केले आहे. या मिशनचा दुसरा टप्पा १६ मे ते २२ मे दरम्यान राबविला जाणार आहे. एअर इंडियाच्या १४९ फ्लाईटद्वारे ३१ देशांत अडकलेल्या सुमारे १६ हजार नागरिकांना माघारी आणण्यात येणार आहे.

मात्र, दुसऱ्या टप्प्यात ३१ देशांतील २५ हजार नागरिकांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. अमेरिकेतून येणारी विमाने गुरजात, कर्नाटक, दिल्ली, तेलंगाणा, ओडिशा, चंदीगड आणि केरळात उतरणार आहेत. तर युएईतून येणारी विमाने केरळ, तेलंगाणा, ओडिशा, दिल्ली, आंध्रप्रदेश आणि केरळमध्ये उतरणार आहेत, अशी माहिती ईटीव्ही भारतला मिळाली आहे.

कोणत्या देशात किती फ्लाईट?

१३ अमेरिका

११ संयुक्त अरब अमिरात(युएई)

१० कॅनडा

९ इंग्लड

९ सौदी अरेबिया

वंदे भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात ३१ फ्लाईटद्वारे ६ हजार ३७ नागरिकांना परत भारतात आणण्यात आले. पहिला टप्पा ७ मे ते १२ मे दरम्यान चालला. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांद्वारे ही सेवा चालविण्यात आली. नागरी उड्डाण मंत्रालायने याबाबत माहिती दिली.

पहिला टप्पा पूर्ण

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे देशांतर्गत तसेच परदेशी विमान सेवा बंद आहे. १७ मे पर्यंत देशातील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, परदेशात अडकलेल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी विषेश विमान सेवा सुरु करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details