नवी दिल्ली -कोरोना विषाणूमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन सुरू केलं आहे. याअंतर्गत जगातील देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी विशेष विमानं पाठवली जात आहेत. 3 जुलै ते 15 जुलै या दरम्यान एअर इंडियाकडून वंदे भारत मिशन -4 राबवण्यात येणार आहे. 17 देशातून 170 विमानांद्वारे भारतीयांना मायदेशी आणले जाईल.
वंदे भारत मिशन - 4 अंतर्गत कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, केनिया, श्रीलंका, फिलिपाईन्स, सौदी अरेबिया, बांगलादेश, थायलंड, दक्षिण अफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यामनार, जपान, युक्रेन, व्हिएतनाम आणि किर्गिस्तान या देशातून भारतीयांना आणले जाणार आहे.