नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (गुरुवारी) सकाळी नवी दिल्ली ते वैष्णवदेवी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. नवरात्र उत्सवानिमित्ताने काश्मीरवासीयांना वंदे भारत एक्सप्रेस भेट दिल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. तसेच या एक्सप्रेसमुळे काश्मीरमधील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
आत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली वंदे भारत एक्सप्रेस आता फक्त ८ तासांमध्ये दिल्लीवरुन कटाला येथे पोहचेलं. त्यामुळे काश्मीरमधील पर्यटनाला चालना मिळणार असून भाविकांनाही आरामामध्ये प्रवास करता येणार आहे. जम्मूमधील लोकांना ही नवरात्रीची भेट असल्याचे ट्विट मोदींनी केले आहे. या रेल्वेचे कमीतकमी तिकीट १ हजार ६३० रुपये असून जास्तीत जास्त तिकीट ३ हजार १४ रुपये आहे.
हेही वाच - दिल्ली ते वैष्णवदेवी धावणार वंदे भारत एक्सप्रेस, अमित शहांनी दाखवला हिरवा झेंडा