नवी दिल्ली - नॅशनल कॅरीयर एअर इंडिया आणि सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेसचे विमाने परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी आज शनिवारी विशेष उड्डाणे भरणार आहेत. यावेळी कतार, ओमान, मलेशिया, युएई आणि युकेमध्ये अडकलेल्या नागरिकांची घरवापसी होणार आहे.
आज वंदे भारत मिशनचा तिसरा दिवस असून एअर इंडियाची विमाने ढाका, सिंगापूर, न्युयॉर्क, कुवेत या चार ठिकाणांसाठी उड्डाणे भऱणार आहेत. तसेच एअर इंडिया एक्सप्रेसद्वारे दोहा, मस्कत, कुआलालम्पूर, शारजाह आणि कुवेत या ५ शहरांसाठी विमाने जातील.
एअर इंडिया एक्सप्रेसने तयार केलेल्या विमानाच्या उड्डाणानुसार, 'IX 475' हे विमान कोचीवरून दोहासाठी, 'IX 395' कोचीवरून कुवेतसाठी, 'IX 443' कोचीवरून मस्कतसाठी, 'IX 682' तिरुचिरापल्ली वरून कुआलालम्पूरसाठी, तर 'IX 183' हे विमान दिल्लीवरून शारजाहसाठी निघणार आहे.
परतीच्यावेळी, 'IX 184' (IX 183) विमान आधी लखनौ येथे २० वाजून ५० मिनिटांनी लँड होईल, त्यानंतर दिल्ली येथे २२ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.
एअर इंडियाचे 'AI 1242' हे विमान ढाका येथून दिल्लीसाठी उड्डाण भरणार असून ३ वाजण्याच्या सुमारास पोहोचणार आहे. 'AI 130' हे विमान लंडनवरून मुंबईसाठी, तर 'AI 174' हे सॅन फ्रॅन्सिस्कोवरून मुंबईसाठी आणि 'AI 988' कुवेतवरून हैदराबादसाठी उड्डाण भरणार आहे.
दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसने लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या कतार, ओमान, मलेशिया, युएई आणि कुवेत या देशांच्या नागरिकांसाठी बुकींग सुरू केले आहे. मात्र, बुकींपूर्वी अटी शर्ती वाचून आपण त्या प्रकारात मोडतो की नाही, हे प्रवाशांनी तपासणे गरजेचे आहे.
मिशनच्या दुसऱ्या दिवशी सिंगापूर, ढाका आणि आखाती देशात अडकलेल्या एक हजारापेक्षा जास्त भारतीयांना परत आणले, तर २६४ विदेशी प्रवासी दिल्लीवरून युएस, युके आणि सिंगापूरला पाठविण्यात आले.