भोपाळ :गुनामधील मागासवर्गीय दाम्पत्याला पोलिसांनी मारहाण केलेले प्रकरण ताजे असतानाच, आणखी एका दलित तरुणाला मारहाण होत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. धान्य चोरी केल्याच्या संशयावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यानंतर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.
गुना शहराच्या गल्ला मंडीमध्ये ही घटना घडली. या व्हिडिओमध्ये काही लोक या तरुणाला बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत. एवढेच नाही, तर मारहाण केल्यानंतर जेव्हा हा तरुण बेशुद्ध झाला, तेव्हा त्या लोकांनी तरुणाच्या गळ्यात टॉवेल बांधत त्याला जमीनीवर फरपटतही नेले. यानंतर या तरुणाची स्थिती गंभीर होत चालल्याचे दिसताच त्याला तिथेच सोडून ते पळून गेले.