नवी दिल्ली - 2021 मध्ये हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळा होणार आहे. त्यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. शनिवारी दिल्ली येथे दोघा नेत्यांची भेट झाली. रावत यांनी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली.
महाकुंभ मेळ्यासाठी उत्तराखंडाला केंद्राच्या मदतीची अपेक्षा - मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत न्यूज
हरिद्वारमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तराखंड सरकारच्यावतीने जोरदार तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी अंदाजे 15 कोटी भाविक उत्तराखंडला भेट देण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुमारे एक हजार कोटींची कामे हरिद्वारमध्ये सुरू आहेत.
पुढच्या वर्षी हरिद्वारमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तराखंड सरकारच्यावतीने जोरदार तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी अंदाजे 15 कोटी भाविक उत्तराखंडला भेट देण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुमारे एक हजार कोटींची कामे हरिद्वारमध्ये सुरू आहेत, अशी माहिती त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली.
हेही वाचा - देशाला पाहिजेत आणखी शंभर उपग्रह!
या भेटी दरम्यान केदारनाथ येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती रावत यांनी मोदींना दिली. एप्रिल 2020 मध्ये सुरू होणाऱया 'वेलनेस समिट'चे उद्घघाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्यात आले. उत्तराखंडमध्ये आत्ता पर्यंत 305 वेलनेस केंद्रांची निर्मिती झाली असून मार्च 2020 पर्यंत 462 केंद्रांची उभारणी केली जाणार आहे.