महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'गाय ऑक्सिजन देते; गायीच्या सहवासात राहिल्याने क्षयरोग बरा होतो..' - uttarakhand

डेहराडून येथील एका कार्यक्रमादरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हे गायीचे दूध, शेण, गोमुत्र यांचे  वैद्यकीय फायदे सांगत असल्याचा एक व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. रावत यांच्या या वक्तव्याची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. यानंतर मुख्यमंत्री कार्लयालयाला या विधानावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

By

Published : Jul 26, 2019, 6:04 PM IST

डेहराडून- उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी "गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो फक्त ऑक्सिजन घेतच नाही तर श्वासाद्वारे ऑक्सिजन सोडतो देखील." असा अजब दावा केला आहे. तसेच गायीचा मसाज केल्यास श्वासासंबधित समस्या बऱ्या होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फोडले आहे. '

डेहराडून येथील एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री रावत हे गायीचे दूध, शेण, गोमुत्र यांचे वैद्यकीय फायदे सांगत असल्याचा एक व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रावत गाय फक्त ऑक्सिजन घेतच नाही तर सोडते देखील, असे सांगत आहेत. तसेच गायीचा मसाज केल्याने श्वसनासंबधी आजार बरे होतात आणि गायीच्या सहवासात राहिल्याने क्षयरोग देखील बरा होतो, असा अजब दावाही त्यांनी केला आहे. तसेच मी जेव्हा पशुपालन मंत्री होतो तेव्हा या संबंधित वैज्ञानिक परिक्षण केल्याचेही त्यांनी सांगितले.

रावत यांच्या या वक्तव्याची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. यानंतर मुख्यमंत्री कार्लयालयाला या विधानावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे स्थानिकांची भावना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अलिकडेच उत्तराखंडचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नैनितालचे खासदार अजय भट्ट यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, की बागेश्वर जिल्ह्यातील गुरुड गंगेचे पाणी पिल्यास गर्भवती महिला सेझियन प्रसुती टाळू शकतात. या वक्तव्यानंतर आता मुख्यंमत्र्यांनी गायी संबंधित, असे वक्तव्य करुन नव्या वादाला सुरुवात केली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details