लखनऊ -सीतापूर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांसह पेटवून घेतले. रजनी नाव असलेल्या या महिलेने प्रवेश आणि छोटू या दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून स्वत:ही पेटवून घेतले. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
उत्तर प्रदेशात महिलेने घेतले दोन मुलांसह पेटवून - उत्तर प्रदेश महिला आत्महत्या
महिलेने पेटवून घेतल्याची घटना कौंटुबिक वादातून घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. महिलेने आत्महत्या केली तेव्हा तिचा पती आणि सासरची मंडळी शेतात गेल्याची माहिती समोर आली आहे.
आत्महत्या
कौंटुबीक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. महिलेने आत्महत्या केली तेव्हा तिचा पती आणि सासरची मंडळी शेतात गेलेले होते. पोलिसांनी तीनही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.