लखनौ : उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या तीन दलित मुलींवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही बहिणी रात्री घराच्या छतावर झोपल्या होत्या. यावेळी रात्री एका तरुणाने छतावर चढत त्यांच्यावर अॅसिड फेकले. यामधील सर्वात मोठ्या बहिणीवर अॅसिड फेकण्यात आले होते. त्यावेळी तिच्या शेजारी झोपलेल्या तिच्या दोन्ही बहिणींवरही अॅसिड उडाले.