लखनऊ -उत्तर प्रदेश सरकारने घेतलेत्या नव्या निर्णयानुसार, राज्यातील तिहेरी तलाकला बळी पडलेल्या महिलांना वार्षिक सहा हजार रूपये पेन्शन देण्यात येणार आहे. सरकारी सूत्रांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली.
चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये, सरकारने तिहेरी तलाक प्रथेला बळी पडलेल्या महिलांना मदत देण्याचे ठरवले आहे. यानुसार, एका महिलेला महिन्याला ५०० रूपये पेन्शन देण्यात येईल. यावर प्रतिक्रिया देताना शिया समाजाचे नेते मौलाना सैफ अब्बास म्हणाले, की सरकारने तिहेरी तलाक पीडितांना आर्थिक मदत देण्याऐवजी, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि राहण्यासाठी जागा यावर लक्ष द्यावे.