उत्तरप्रदेश: कारखान्यात विषारी वायुगळतीमुळे ३ बालकांसह सात जणांचा मृत्यू - जलालपूर गॅस गळती उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या गॅस गळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोतवाली बिसवा येथील जलालपूर येथे ही घटना घडली.
सीतापूर गॅस गळती
लखनौ- उत्तरप्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोतवाली बिसवा येथील जलालपूर येथे ही घटना घडली. या वायूमुळे तीन पुरुष, तीन लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे.