नवी दिल्ली -उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी चर्चेमध्ये राहण्यासाठी टि्वट करतात, अशी टीका मोर्य यांनी केली आहे.
अखिलेश यादव, प्रियंका गांधी चर्चेमध्ये राहण्यासाठी करतात टि्वट; यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांची टीका - priyanka gandhi
उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना फक्त टि्वट करता येते. दोघेही घटनेतील वास्तव जाणून न घेता फक्त चर्चेमध्ये राहण्यासाठी टि्वट करत असतात. त्या दोघांचे टि्वटर प्रेम पाहून त्यांनी आपली नावे टि्वटर यादव आणि टि्वटर वाड्रा अशी ठेवायला हवीत, असा टोला त्यांनी लगावला.
देशाभरातील घटनांवर अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी टि्वटरवर व्यक्त होतात. दोघेही टि्वटच्या माध्यमातून केंद्र आणि मोदी सरकावर टीका करताना पाहायला मिळाली आहेत. नुकतंच प्रियंका गांधी यांनी जीडीपीतील घसरणवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. तर महाराष्ट्रातील राजकारणावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली होती.