लखनऊ -कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संकटकाळात अनेक जण गरीबांच्या आणि गरजूंच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचवेळी, काही लोक अशा परिस्थितीतही स्वतःचा फायदा कसा होईल, हेच पाहत आहेत. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्येही अशाच तीन व्यक्तींना, रेशनच्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
धान्य पुरवठा विभागाच्या एका पथकाने ही कारवाई केली. यामध्ये त्यांनी रेशनच्या दुकानातून दुसरीकडे नेण्यात येणारा २९ क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. स्टेशन हाऊस ऑफिसर कुलदीप सिंग यांनी याबाबत माहिती दिली.